आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त १,००० विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप

आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त १,००० विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप
जळगाव, (प्रतिनिधी) – जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत तब्बल १,००० गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वह्या आणि दप्तरांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आमदार राजूमामा भोळे यांचा वाढदिवस १३ जून रोजी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त होर्डिंग, बॅनरबाजी किंवा जाहिरातींवर खर्च न करता समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यादान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपच्या नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे १,००० वह्यांचे संकलन केले.
या उपक्रमाअंतर्गत रविवारी (दि. २१) सकाळी सरदार वल्लभभाई पटेल भवन येथे वह्या व दप्तर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खासदार स्मिता वाघ, महापौर दिपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, भाजप प्रदेश सदस्य संतोष इंगळे यांच्यासह नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन मिलिंद गोविंद चौधरी आणि उदय भालेराव यांनी केले. यावेळी जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे १,००० विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भाजपचे सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, प्रकाश पंडित, मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे, अजित राणे, विनोद मराठे, अतुल बारी तसेच नगरसेवक, विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांनी आमदार राजूमामा भोळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.





