खान्देशजळगांवशिक्षण

रोझलँडच्या विद्यार्थ्यांची किल्ले निर्मिती स्पर्धेत बाजी; प्रथम क्रमांकावर नाव कोरले

रोझलँडच्या विद्यार्थ्यांची किल्ले निर्मिती स्पर्धेत बाजी; प्रथम क्रमांकावर नाव कोरले

पाच विद्यार्थ्यांच्या संघाचे घवघवीत यश; दुसऱ्या संघालाही उत्तेजनार्थ पारितोषिक

जळगाव, प्रतिनिधी : आंतरशालेय किल्ले निर्मिती स्पर्धेत रोझलँड इंग्लिश मीडियम हायस्कूल, जळगावच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि कलात्मक कौशल्याला या यशामुळे विशेष दाद मिळाली. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेत सान्वी स्वप्नील साबळे, हेतल युवराज चौधरी, पीयूष दीपक बोरसे, राज जितेंद्र मोरे आणि तन्मय मनोज पवार यांच्या संघाने उत्कृष्ट किल्ल्याची निर्मिती करत प्रथम क्रमांक मिळवला. तसेच मिष्टी दीपक भाटिया, रुद्र दीपक बोरसे, नैतिक बालाजी राऊत, पार्थ सेतू नांद्रेकर आणि साई सुनील मराठे या विद्यार्थ्यांच्या संघाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.

विद्यार्थ्यांनी किल्ले निर्मितीतून महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा, गड-किल्ल्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि मराठी संस्कृतीचे दर्शन घडवले. आकर्षक मांडणी, कल्पकता आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या कलागुणांचे मान्यवरांनी कौतुक केले.

या यशाबद्दल रोझलँड इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या व्यवस्थापनाने, मुख्याध्यापकांनी, शिक्षकवृंदाने आणि पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button