धरणगाव ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 35 वर्षीय महिला घरात स्वयंपाक करीत असताना एकाने तिच्या घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने बलात्कार केल्याचा प्रकार 12 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. तसेच पीडित महिलेने घटनेनंतर आरडाओरड केली असता तिच्या पती व मुलाला चाकूने मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,
पीडित महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १२ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजेचे सुमारास 35 वर्षीय पीडित महिला ही घरात स्वयंपाक करीत असतांना आरोपी रामजी कृष्णा संदानशिव हा त्याच्या घराचे मागील दरवाज्याने घरात घुसुन त्याने पीडित महिलेला चाकुचा धाक दाखवुन बळजबरीने महिलेशी जबरी अत्याचार केला. तेव्हा यानंतर पीडीत महिलेनेआरडाओरड केल्याने त्याचे पती व मुलगा असे धावत आले तेव्हा आरोपी रामजी कृष्णा संदानशिव याने पीडित महिलेचे पती यांचेवर चाकुने दाढीवर, डोळ्याखाली, कपाळावर वार करुन जखमी केले .त्यानंतर घराच्या अंगणात रामजीचे वडील आरोपी कृष्णा कामचंद संदानशिव, प्रतिपाल कृष्णा संदानशिव अशांनी हातात लाकडी दांडा व कु-हाड घेवुन आले व दांड्यांने पीडित महिलेच्या पतीला व मुलाला मारहाण करुन जबर दुखापत केली. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास
सपोनि जिभाऊ तु. पाटील, करीत आहे.