भुसावळ;- येथील बस स्टँड परिसरातून एकाचा बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबवून पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्यां काही तासातच अटक केली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जळगाव येथील मास्टर कॉलनी परिसरात राहणाऱ्या राहणाऱ्या व हात मजुरी करणाऱ्या 21 वर्षीय महेंद्र रामनारायण यादव यादव यांचा मोबाईल आरोपी सुरज भांगे याने 9 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भुसावळ बस स्टँड पासून बळजबरीने हिसकावून पळ काढला होता. तसेच महेंद्र यादव यांनी आरोपीचा पाठलाग करून थांबविले असा त्याला चाकूचा धाक दाखवून आरोपीने बळजबरीने दोनशे रुपये काढून घेतले होते . याप्रकरणी महेंद्र यादव याने भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरज भांगे याला अटक केली आहे. त्या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये करीत आहे.