जळगाव ;- पोदार इंटरनॅशनल स्कुल,जळगाव येथे २३ ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घटस्थापने पासूनच उत्सवाला अनुसरून विविध उपक्रम शाळेमार्फत घेण्यात आले.
या शाळेचे प्रसंगी प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी दीपप्रज्वलन व देवी महागौरीच्या प्रतिमेचे पूजन करीत उपासना केली . मंचावर उपस्थित शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी,पालकवर्ग व शिक्षकवृंद यांचे स्वागत केले .
कु. श्लोक वारके या विद्यार्थ्याने नवरात्र उत्सवाचे महत्व आपल्या भाषणात स्पष्ट केले. यावेळी ई.५ वी च्या विद्यार्थ्यांनी देवीच्या नऊ रुपांसह महिषासुर मर्दिनी च्या रूपचे प्रकटीकरण केले. अधर्मावर धर्माचा व असत्यावर सत्याचा विजय हा रोमांचकारी प्रसंग महिषासुर वध याद्वारे प्रेक्षकांसमोर सादर केला.
विद्यार्थिनींनी लक्षवेधक गरबा नृत्य सादर केले यातून श्रोत्यांना एकात्म, बंधुभाव व सदाचार व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या सुंदर सदरीकरणासाठी शिक्षकवृन्दानी त्यांचे कौतुकं केले.
कु.दिशा पाटील हिने दसरा सानाच्ये महात्म्य श्रोत्यांसमोर उलगडले. यापाठोपाठ प्रभू श्रीराम यांच्या हातून अहंकारी रावणाचा वध हा प्रसंग नाट्यमय रुपात प्रेक्षकांसमोर सादर केला .
शाळेच्या शिक्षिका कु. तेजल महाजन यांनी नवरात्री तसेच दसऱ्याच्या शुभेच्छा देत भारतीय परंपरेत सणांचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. या उत्सवातून पौराणिक कथा तसेच संस्कृतीचे दर्शन घडत असते अश्या थोर परंपरेचा आपण अभिमान बाळगावा असे मत त्यांनी यावेळी मांडले. उत्सवात बंधुभाव ,आपुलकी व उदारतेची भावना अधिक बळकट व्हावी असे आवाहन केले.
पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या प्रांगणातून हा कार्यक्रम साजरा करीत असताना विद्यार्थी तसेच शाळेतील सर्व शिक्षक आवर्जून उपस्थित होते.
या प्रसंगाचे औचीत्य साधून शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी पालक,विद्यार्थी व उपस्थितांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ठ सादरीकरणासाठी प्रशंसा केली तसेच उपस्थितांना दसरा ह्या शुभ मुहूर्ताच्या मनस्वी शुभेच्छा दिल्या.
शाळेचे उप-प्राचार्य दिपक भावसार ,पोदार जम्बो किड्स च्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ , शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.