चोपडा ;- तापी सुत गिरणीच्या पुढे एका वळणावर दरोडाच्या तयारीत असलेल्या टोळीतील चार दरोडेखोरांना धरणगाव ते चोपडा रोडवर असलेल्या अटक करण्यात चोपडा शहर पोलिसांना यश आले आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा ते धरणगाव रोडवर असलेल्या तापी सुत गिरणीच्या पुढे एका वळणावर काही दरोडेखोर टोळीच्या माध्यमातून दरोडा टाकण्यासाठी वाहनातून येत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या सूचनेनुसार चोपडा शहर पोलिसांनी बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचार ते साडेसहा वाजेच्या दरम्यान सापडारातून मोठ्या शितापीने टोळीतील ४ जणांना अटक करण्यात आली आहे.
हे दरोडेखोर टोळीने दरोड्याचा प्रयत्न करत असताना मिळून आले. त्यांच्याजवळ दरोडा घालण्याचा साहित्य महिंद्रा पिकअप व्हॅन क्रमांक (एमपी ०९ जीसी ५०६१) आणि महिंद्रा कंपनीचे जनरेटर मशीन असा एकूण 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दीपक विसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दरोडेखोर दादला सिराम नरगावे (वय-२०) रा.किरचली ता. सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश, सियाराम बेलोरसिंग चव्हाण (वय-२३) रा. झेंडीखोद्री ता. सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश, जगदीश दमडीया नरगावे (वय-२४) रा. किरचली ता. सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश, ऋषिकेश रामलाल सोलंकी (वय-१९) रा. कुमठाना ता. सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश, अर्जुन बळीराम आर्य (वय – १९) राहणार झेंडेखोद्री, ता. सेंधवा, जि. बडवाणी मध्यप्रदेश याच्यासह इतर ३ ते ४ जणांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यापैकी चार आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे.