चाळीसगावः राज्यातील सर्वच मतदार संघातील मतदानाची आकडेवारी आता समोर आली आहे. त्यात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आजवरच्या इतिहासात सर्वाधिक मते घेऊन विजयी झालेल्या मंगेश चव्हाण यांचा नावावर नवीन विक्रम झाले आहेत.
जिल्ह्यातील सर्वात तरुण आ. मंगेश चव्हाण असून तरुण कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील सर्व उमेदवारांपैकी सर्वाधिक मते त्यांनी घेतली आहेत. १ लाख ५७ हजार १०१ इतके सर्वाधिक मते घेणारे ते जिल्ह्यात नंबर १ ठरले आहेत. तसेच राज्यात सर्वाधिक मते घेणाऱ्या २८८ पैकी २५ आमदारांमध्ये देखील त्यांनी आपला २४ वा नंबर पटकावला आहे. राज्यात दीड लाखांहून मते घेणारे जवळपास ३२ आमदार आहेत. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश आहे,
त्यामध्ये धुळे रघुवेंद्र पाटील १ लाख ७० हजार ३९८, बागलाणचे दिलीप बोरसे १ लाख ५९ हजार ६८१ मालेगावचे दादाजी भुसे १ लाख ५८ हजार २८४, चाळीसगावचे मंगेश चव्हाण १ लाख ५७ हजार १०१, नाशिकचे राहुल ढिकले १ लाख ५६ हजार ८४६ नंदुरबारचे विजयकुमार गावित १ लाख ५५ हजार १९० जळगाव सुरेश भोळे-१ लाख ५१ हजार ५२६, शिंदखेडा जयकुमार रावल-१ लाख
५१ हजार ४९२ यांचा समावेश आहे. राज्यात सर्वाधिक मते चिंचवड येथील शंकर जगताप-२ लाख ३५ हजार ३२३ यांना मिळाली आहेत. चाळीसगाव मतदारसंघात गेल्या अडीच वर्षातील भरीव विकास कामांमुळे जनतेने त्यांना भरभरून मतदान केल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे. पुणे, मुंबई नागपूर सारख्या शहरातील मोठ्या मतदार संघाच्या तुलनेने ग्रामीण भागातून आ. मंगेश चव्हाण यांनी सर्वाधिक मते घेऊन राज्यातील टॉप २५ मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. हे विशेष होय.