जळगाव ;- उउधारीच्या पैशांवरून एका तरूणाला शिवीगाळा व दामदाटी केल्याची घटना शहरातील तांबापूरा येथे मंगळवारी १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जळगाव शहरातील तांबापूरा येथील सावलीय मशिदजवळ अकिल शहा हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून त्यांनी संदीप घुगे रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांच्याकडून काही पैसे उसनवारीने घेतले होते. मंगळवारी १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता अकिल शहा हा घरी असतांना संदीप घुगे हा घरी पैसे घेण्यासाठी आली. ते पैसे अकिल शहा यांनी दिले नाही याचा राग आल्याने संदीप घुगे यांने शिवीगाळ करून दमदाटी केली. हा प्रकार घडल्यानंतर अकीश शहा याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ नितीन पाटील हे करीत आहे.