जळगाव प्रतिनिधी :-जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरू असून दररोज कुठे ना कुठे अपघात होऊन नागरिकांचा नाहक बळी जाण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत.
जिल्ह्यातील एरंडोल येथील अमळनेर नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाक्याजवळ रविवारी 22 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका टँकरने दुचाकी ला जोरदार धडक दिल्याने दोन जण ठार झाल्याची घटना घडली. घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करून रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
राजू भिला भोई वय 46 रां. एरंडोल आणि दीपक रामकृष्ण मोरे वय 34 शिरसोली ता जळगाव असे मयत व्यक्तींची नावे असून दोन्ही एकमेकांचे साडू होते.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की राजू भोई यांच्या पुतणीचे सोमवारी लग्न असल्याने रविवारी हळदीचा कार्यक्रम झाला यानंतर राजू भोई व दीपक मोरे घराकडे जात असताना टँकर क्रमांक एम एच 19 बीपी 2003 ने अमळनेर नाक्याजवळ दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यात राजू भोई जागेस ठार झाले तर दीपक मोरे यांचा एरंडोल ग्रामीण रुग्णालय येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला. या प्रकारे टँकर चालकाविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी टँकर जप्त केला आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे लग्न घरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघात प्रकरणी नाही चे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्यावर सदस मनुष्यवताचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत एरंडोल वासियांनी महामार्गावर आंदोलन केले.