युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने
जळगाव l २७ जुलै २०२३ l १९९९ मध्ये झालेल्या भारत-पाक मध्ये मे ते जुलै महिन्यात झालेल्या कारगील युद्धात विरगती प्राप्त 527 भारतीय लष्कराच्या वीर शहीदांना 24 व्या कारगील विजय दिवसानिमित्त काव्यरत्नावली चौक जळगाव येथे युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या तर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांनी पुष्पांजली वाहून व मेणबत्त्या लावून आदरांजली वाहीली. कारगील युद्धातील चित्तथरारक प्रसंगांना यावेळी उजाळा देण्यात आला. देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले होते.
यावेळी महाराष्ट्र एनसीसी 18 बटालीयनचे कमांडींग ऑफिसर कर्नल पवन कुमार, कॅप्टन मोहन कुलकर्णी, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, सचिव अमित जगताप, प्रितम शिंदे, लेफ्टनंट शिवराज पाटील, सुभेदार मेजर प्रेम सिंग, सुभेदार गुप्ता, बी.एच.एम नरेंद्र सिंग, अनिल कुमार, नरेश सोनावणे, माजी वायुदल अधिकारी महिंद्रा चौधरी, पियुष हसवाल, सुनील चौधरी, हर्षल मुंडे, प्रशांत वाणी, राहूल चव्हाण, संदिप सुर्यवंशी, सोमसिंग पाटील, पियुष तिवारी, सौरभ कुळकर्णी, रवी हसवाल, यश राठोड, देव खाचणे, सुरज परदेशी, ओम पाटील, धनंजय भावसार, यश चौधरी, कुणाल बाविस्कर, आयुष चव्हाण, डॉक्टर आशिष जाधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.