जळगावमध्ये गौसिया अकॅडमीतर्फे वृक्षारोपण अभियान

जळगावमध्ये गौसिया अकॅडमीतर्फे वृक्षारोपण अभियान
जळगाव (आसिफ शेख): गौसिया अकॅडमी मुंबई यांच्या वतीने जळगाव शहरातील स्थानिक टीमच्या सहकार्याने वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले. इस्लामी वर्षातील पहिला महिना मोहर्रम सुरू असल्याने रविवार, १३ जुलै रोजी आजाद नगर पिंपराळा परिसरात फहीम महाते यांच्या हस्ते या वृक्षारोपणाचा शुभारंभ झाला.
या वेळी पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करत मुश्ताक बहेश्ती यांनी सांगितले की, “शुद्ध हवेसाठी झाडांचे अस्तित्व अत्यावश्यक आहे.” फरहान अहमद यांनी सांगितले की, “वृक्षारोपण ही एक सामाजिक गरज असून आपल्या पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत.”
फारूक बहेश्ती यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आणि वृक्षारोपण अभियान राबवण्यासाठी गौसिया अकॅडमीच्या सदस्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमावेळी मुबीन शेख, फहीम महाते, जावेद शेख, शरीफ शेख, मुश्ताक बहेश्ती, फारुक बहेश्ती, शाह एजाज आदी मान्यवर उपस्थित होते.
