खान्देशगुन्हेजळगांव

एटीएम कार्ड बदलून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला सव्वा दोन लाखांचा गंडा; जळगावमधील घटना

एटीएम कार्ड बदलून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला सव्वा दोन लाखांचा गंडा; जळगावमधील घटना

​बँक खात्यातून २ लाख ३१ हजार रुपये लंपास; जिल्हा पेठ पोलिसांत गुन्हा दाखल

​जळगाव | प्रतिनिधी पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्रात गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची नजर चुकवून अज्ञाताने त्यांचे एटीएम कार्ड बदलले आणि त्यांच्या खात्यातून २ लाख ३१ हजार ३९६ रुपये परस्पर काढून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​देविदास रामा कोळी (वय ६१, रा. रायपूर, ता. जळगाव) असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठाचे नाव असून ते जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत.

अशी झाली फसवणूक
​२६ मार्च रोजी कोळी हे राजकमल टॉकीज परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी २० हजार रुपये काढल्यानंतर, त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका हेल्मेटधारी व्यक्तीने “बाबा तुमचे एटीएम कार्ड दाखवा” असे म्हणून त्यांच्या हातातील कार्ड घेतले. त्याचवेळी त्याने हातचलाखी करून कोळी यांचे कार्ड स्वतःकडे ठेवले आणि त्यांना दुसरे कार्ड परत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button