खान्देशगुन्हेजळगांव

राहत्या घरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; एमआयडीसी परिसरातील घटना

राहत्या घरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; एमआयडीसी परिसरातील घटना

जळगाव : शहरातील एमआयडीसी परिसरात राहत्या घरात गळफास घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १३ एप्रिल) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. कृष्णा वसंत रेणुके (वय ३६, रा. रामेश्वर कॉलनी) असे मयत युवकाचे नाव आहे.

कृष्णा रेणुके हे एमआयडीसी परिसरातील चटई कंपनीत कामाला होते.

मध्यरात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. सकाळी त्यांच्या आई घरात गेल्या असता मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तातडीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button