खान्देशगुन्हेजळगांव

रिक्षा चोरीप्रकरणी आरोपी जेरबंद; चोरीची रिक्षा जप्त

रिक्षा चोरीप्रकरणी आरोपी जेरबंद; चोरीची रिक्षा जप्त

जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील सिव्हील हॉस्पिटल परिसरातून चोरीस गेलेल्या रिक्षाप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक करून चोरीची रिक्षा जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सिव्हील हॉस्पिटल गेट क्रमांक ३ येथील पार्किंगमधून MH-19 BJ 4025 क्रमांकाची तीनचाकी अॅपे रिक्षा चोरीस गेली होती. याप्रकरणी दि. १३ एप्रिल रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित कल्पेश ज्ञानेश्वर इंगळे (वय ३२) याचा शोध घेतला. तो रामेश्वर कॉलनी, मेहरूण येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसरात सापळा रचला.

दरम्यान, पांडे डेअरी चौक परिसरात एमएसईबी कार्यालयाजवळ संशयित रिक्षा आढळून आली. पोलिसांनी ती थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव कल्पेश इंगळे असल्याचे सांगितले. पुढील चौकशीत त्याने सिव्हील हॉस्पिटल येथून रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ७५ हजार रुपये किमतीची काळ्या-पिवळ्या रंगाची अॅपे रिक्षा जप्त केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक कमलेश पवार करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मिलिंद सोनवणे, कमलेश पवार, तुषार पाटील, गोविंद साबळे, नरेंद्र दिवेकर व प्रवीण जाधव यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button