
अनधिकृत होर्डिंगप्रकरणी भंगाळे गोल्डला पुन्हा ६० हजार रुपयांचा दंड ; एकूण वसुली १.२० लाखांवर
मनपाची कारवाई; नियमभंगावर कडक भूमिका कायम
जळगाव : शहरातील अनधिकृत होर्डिंगविरोधातील मोहिमेत महापालिका प्रशासनाने पुन्हा कारवाई करत भंगाळे गोल्ड या आस्थापनाकडून सुमारे ६० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यापूर्वीही याच प्रकरणी दंड आकारण्यात आला होता. त्यामुळे आतापर्यंत एकूण १ लाख २० हजारांहून अधिक रकमेची वसुली करण्यात आली आहे.
तक्रारीनंतर कारवाईला वेग
यापूर्वी शहरातील हॉटेल रूपाली येथील अनधिकृत होर्डिंग व एलईडी स्क्रीन प्रकरणही चर्चेत आले होते. सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर प्रशासनाने कारवाई करत दंड आकारला होता.
नियमभंगावर कारवाई सुरूच
अनधिकृत होर्डिंग लावून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. शहरात बेकायदेशीर जाहिरात फलकांविरोधात मनपाकडून सातत्याने मोहीम राबवली जात असून, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे.
महापालिकेचा इशारा
अशा प्रकारचे उल्लंघन पुन्हा आढळल्यास अधिक कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.




