सै. नियाज अली भैय्या फाऊंडेशन तर्फे तिरंग्याचा अपमान करणाऱ्याचा निषेध व कडक कारवाई ची मागणी –

सै. नियाज अली भैय्या फाऊंडेशन तर्फे तिरंग्याचा अपमान करणाऱ्याचा निषेध व कडक कारवाई ची मागणी –
जळगाव I प्रतिनिधी
भारत देश व भारतीयांनी नेहमी आपल्या महान व प्राचीन संस्कृतीला अनुसरून सर्व देशांचे व देशवासीयांचे नेहमी सन्मान व आदर केलेला आहे. कधीही भारतीयांनी स्वतः हून कोणत्याही देशाच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केलेला नसून नेहमीच सन्मानच केलेला आहे.
परंतु असे असतांना सुद्धा अमेरिकेत एका नालायकाने कोणतेही कारण नसतांना भर चौकात रस्त्यावर, भर दिवसा आपल्या भारताचे आन – बान – शान म्हणजेच ओळख असलेल्या भारतीय ध्वज पवित्र तिरंगा फाडून , जमिनीवर फेकलेलाअसून पायदळी तुडविलेला आहे. हे कृत्य म्हणजे ज्या दिवसापासून तिरंग्याला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता मिळालेली आहे ते आजतायागत या तिरंग्यासाठी, त्याचा सन्मान व संरक्षणासाठी शहीद झालेल्या तमाम भारत मातेच्या वीर सुपुत्रांचा सुद्धा त्या नालायकाने घोर अपमान केलेला असून यामुळे समस्तभारतवासीयांचे मन दुखावले गेले असून जो पर्यंत या नालायकाला खडक शासन शिक्षा होत नाही, तो पर्यंत आपल्या सरकारने अमेरिकेशी कोणतेही व्यवहार करू नये, तसेच महामहीम पंतप्रधान साहेब भारत सरकार नवी दिल्ली यांनी अमेरिकेचे महामहीम राष्ट्रपती साहेबांशी स्वतः या विषयी संवाद साधून आम्हा समस्त भारतवासीयांच्या भावना कळवून त्या नालायकाचे हात छाटन्याची मागणी करावी अशी मागणी आज मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव मार्फत सै. नियाज अली भैय्या फाऊंडेशन तर्फे निवेदन देऊन करण्यात आली.
या प्रसंगी सै. नियाज अली भैय्या फाऊंडेशन चे सै. अयाज अली नियाज अली, हाजी शकूर बादशाह, सय्यद जावेद, शफी ठेकेदार, सय्यद उमर, कामील खान, शफीक अहमद इ. उपस्थित होते.





