खान्देशगुन्हेजळगांव

बंद घर फोडून चोरी करणारे त्रिकूट जेरबंद; चांदीचे देवांसह २३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

बंद घर फोडून चोरी करणारे त्रिकूट जेरबंद; चांदीचे देवांसह २३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

एमआयडीसी पोलिसांची यशस्वी कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू नगर परिसरात बंद घर फोडून चोरी करणाऱ्या त्रिकुटाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चोरीस गेलेले चांदीचे देव, पितळी-तांब्याची भांडी आणि गॅस शेगडी असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नातेवाईकांच्या अपघातामुळे घर बंद होते
नेहरू नगर परिसरातील रहिवासी गोविंद रामदास पाटील हे त्यांच्या नातेवाईकांचा अपघात झाल्याने पत्नीसमवेत ८ जून रोजी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. दरम्यान, १० जून रोजी शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती फोनवरून दिली. त्यानंतर ते जळगावला परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. घरातील संसारोपयोगी वस्तूंसह चांदीचे देव चोरीस गेल्याचे आढळून आल्याने त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा शोध
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली.

तांबापुरा परिसरातून तिघे ताब्यात
२१ जून रोजी पोलिसांनी तांबापुरा परिसरात सापळा रचून शाहरुख शहा सिकंदर शहा (वय २४), मुकेश राजू परमार (वय २२) आणि दीपक राजू पाटील (वय २४) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी घरफोडीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

चोरीचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून १५ हजार रुपये किमतीचे ६ चांदीचे देव, ३ हजार रुपये किमतीची एचसी कंपनीची गॅस शेगडी तसेच ५ हजार रुपये किमतीची तांब्या-पितळेची विविध भांडी असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
न्यायालयाकडून पोलीस कोठडी
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार किरण चौधरी करीत आहेत.

पथकाच्या कामगिरीचे कौतुक
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्यासह किरण चौधरी, नितीन ठाकूर, किरण पाटील, राहुल घेटे, रमाकांत साळुंखे, शशिकांत मराठे आणि योगेश घुगे यांचा सहभाग होता.

“गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीचा प्रभावी वापर करून घरफोडी करणाऱ्या त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे. चोरीचा बहुतांश मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील.”
— बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक, एमआयडीसी पोलीस ठाणे, जळगाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button