खान्देशजळगांव

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा -रक्षा खडसे

विविध विभागांना योजनाची प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना; नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे निर्देश

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा –रक्षा खडसे

विविध विभागांना योजनाची प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना; नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे निर्देश

जळगाव, : जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतंर्गत सुरू असलेली विविध विकासकामे निर्धारित कालावधीत पूर्ण करून या योजनांची प्रभावीपणे अंबलबजावणी करावी असे निर्देश केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) अध्यक्षा श्रीमती रक्षा खडसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी बैठकीत त्या बोलत होत्या.
या बैठकीस दूरस्थ प्रणालीद्वारे वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. तर महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने,यावल उपवनसंरक्षक सौरभ सहाय, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी जिल्हा नियोजन समिती सभागृहात उपस्थित होते. या बैठकीत विविध केंद्र सरकार पुरस्कृत विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी जलसंपदा विभागांतर्गत अमृत योजनेच्या प्रगतीचा आढावा घेत संबंधित कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महावितरण विभागाकडील वीज वाहिन्यांच्या( केबल )चोरीच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच लोडशेडिंगच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना किमान पाच तास नियमित वीजपुरवठा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही श्रीमती. खडसे यांनी निर्देशित दिले.

तसेच बैठकीत कृषी, नगरपालिका प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, बँकिंग सुविधा व कर्जवाटप, वृक्षारोपण तसेच विविध पायाभूत सुविधांशी संबंधित विषयांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या. संभाजीनगर– जळगाव या महामार्गासह विविध प्रलंबित रस्त्याची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा
तसेच प्रधानमंत्री पीक बीमा योजना,प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण, पाणीपुरवठा योजना,अटलभुजल योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,क्रीडा विभाग, दूरसंचार,वन विभाग वृक्षा रोपण , रेल्वे प्रकल्प भुसंपादन कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button