खान्देशगुन्हेजळगांव

रिसेप्शनला गेलेल्या तरुणाची मोटारसायकल लांबवली

रिसेप्शनला गेलेल्या तरुणाची मोटारसायकल लांबवली

पदमालय मल्टीपर्पज हॉल परिसरातील घटना; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव | प्रतिनिधी

रिसेप्शन समारंभासाठी गेलेल्या तरुणाची हॉलबाहेर उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना जळगाव शहरातील पदमालय मल्टीपर्पज हॉल परिसरात घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद शाहबाज अली गुलाम अली (वय २५, रा. सुरेश जैन नगर, गेंदालाल मिल परिसर, जळगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ते खासगी कंपनीत नोकरी करतात.

५ जुलै रोजी सायंकाळी मित्राच्या रिसेप्शनसाठी ते पदमालय मल्टीपर्पज हॉल येथे गेले होते. त्यांनी आपली होंडा सीडी-110 (एमएच-19-डीझेड-1528) ही मोटारसायकल हॉलच्या बाजूला स्टेडियमच्या भिंतीलगत पार्क करून कार्यक्रमाला हजेरी लावली. रात्री कार्यक्रम संपल्यानंतर वाहन उभे केलेल्या ठिकाणी गेल्यावर मोटारसायकल दिसून आली नाही.

परिसरात तसेच मित्र व नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतरही मोटारसायकलचा शोध लागला नसल्याने अज्ञात चोरट्याने ती चोरून नेल्याची खात्री झाली. चोरीस गेलेल्या मोटारसायकलीची अंदाजे किंमत ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button