इतर

जनआक्रोश मोर्चामुळे जळगावातील वाहतूक मार्गात तात्पुरता बदल

जनआक्रोश मोर्चामुळे जळगावातील वाहतूक मार्गात तात्पुरता बदल

४ ऑक्टोबरला दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

जळगाव, प्रतिनिधी : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोध संघर्ष समिती, जळगाव जिल्ह्याच्या वतीने रविवारी (दि. ४ ऑक्टोबर) भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू होणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जळगाव शहरातील काही प्रमुख मार्गांवर दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

या मोर्चाचे नेतृत्व व मार्गदर्शन समाज कल्याण मंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, खासदार चंद्रकांत हंडोरे आणि दलित पँथर सेनेचे अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्यासह पदाधिकारी करणार असल्याचे आयोजकांनी पोलिस प्रशासनाला कळविले आहे.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ३३ (१) (ब) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दि. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहतुकीतील बदलाचे आदेश जारी केले आहेत.

असे असतील पर्यायी मार्ग

१) आकाशवाणी चौकाकडून कोर्ट चौकाकडे जाणारी वाहने व एसटी बसेस

आकाशवाणी चौक → कवयित्री बहिणाबाई उद्यान → रिंगरोड → गोकुळ स्वीटमार्ट → शाहू कॉम्प्लेक्स → कोर्ट चौक.

२) कोर्ट चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे जाणारी वाहने व एसटी बसेस

कोर्ट चौक → शाहू कॉम्प्लेक्स → गोकुळ स्वीटमार्ट → रिंगरोड → कवयित्री बहिणाबाई उद्यान → आकाशवाणी चौक.

३) नेरी नाका येथून स्वतंत्र चौकाकडे जाणारी वाहने

नेरी नाका → पांडे चौक → सिव्हिल हॉस्पिटल → बेंडाळे चौक → चित्रा चौक → कोर्ट चौक.

४) प्रभात चौकाकडून नेरी नाका, कोर्ट चौकाकडे जाणारी वाहने

प्रभात चौक → कवयित्री बहिणाबाई उद्यान → रिंगरोड → गोकुळ स्वीटमार्ट चौक → चित्रा चौक → बेंडाळे चौक → नेरी नाका → शाहू कॉम्प्लेक्स.

मोर्चाच्या कालावधीत संबंधित मार्गांवर वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच नागरिकांना गैरसोय होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून वाहतूक नियमन करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी या कालावधीत दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button