इतर

चाळीसगावात मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड

चाळीसगावात मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन आरोपी ताब्यात, तीन दुचाकी जप्त

चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहरातील मोटारसायकल चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत चोरीस गेलेली दुचाकीसह एकूण ८० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच स्वतंत्र कारवाईत एका संशयित इसमासह २५ हजार रुपये किमतीची विनानंबर प्लेटची मोटारसायकलही ताब्यात घेण्यात आली आहे.

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८९/२०२६ अन्वये दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. दरम्यान, चोरीस गेलेली एचएफ डिलक्स मोटारसायकल राहुल सुभाष भिसे (रा. हनुमानसिंग नगर, चाळीसगाव) याने चोरल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खातरजमा करून राहुल भिसे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून होंडा युनिकॉर्न मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. सखोल चौकशीत त्याने चोरीची एचएफ डिलक्स मोटारसायकल प्रशांत दीपक राजपूत (रा. हरीगिरी बाबा नगर, पाटणादेवी रोड, चाळीसगाव) याला विकल्याची कबुली दिली.

त्यानुसार प्रशांत राजपूत याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, राहुल भिसे याने सदर मोटारसायकल २० हजार रुपयांना विकल्याचे निष्पन्न झाले. मोटारसायकलचे आरसी बुक मागितल्यावर नंतर देतो असे सांगून राहुल भिसे टाळाटाळ करत असल्याची माहितीही समोर आली.

या प्रकरणात दोन्ही आरोपींकडून एकूण ८० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

विनानंबर दुचाकीसह संशयित ताब्यात

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करत असताना अहिल्याबाई होळकर चौक परिसरात एक इसम विनानंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्यास थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रशांत दत्तात्रय राठोड (वय २७, रा. यशवंतनगर रोड, चाळीसगाव) असे सांगितले. मात्र, मोटारसायकलबाबत समाधानकारक माहिती देता न आल्याने त्याच्याकडील २५ हजार रुपये किमतीची यामाहा एफझेड मोटारसायकल जप्त करून पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली.

पथकाची उल्लेखनीय कामगिरी

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरबाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील व भूषण पाटील यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button