खान्देशजळगांवसामाजिक

जिल्हा बँकेसाठी राजेश वानखेडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा बँकेसाठी राजेश वानखेडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी राजेशभाऊ वानखेडे यांनी गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) मान्यवरांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, संचालक श्यामभाऊ सोनवणे, घनश्यामशेठ अग्रवाल यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी जळगावचे नगरसेवक पती अमित पाटील, रमेश नागराज पाटील, राजेश पाटील, व्हडोदा येथील किरणभाऊ पाटील, फैजपूरचे नगरसेवक शेख कुर्बानभाई, भूपेंद्र सोनवणे, रावेरचे हमीदशेठ, चारुभाऊ वानखेडे आणि नगरसेवक सुनील जंगले आदी उपस्थित होते.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेशभाऊ वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button