खान्देशगुन्हेजळगांवराजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

जळगाव, प्रतिनिधी : राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक असलेले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव येथील जिल्हा कार्यालयात शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी आणि जिल्हा कार्यालयाचे सरचिटणीस वाय. एस. महाजन यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी वाय. एस. महाजन म्हणाले की, भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील विविध संस्थानांचे विलीनीकरण करून अखंड भारताच्या निर्मितीत ऐतिहासिक योगदान दिले. भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका, त्यांचे कणखर नेतृत्व, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिष्ठा प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील.

कार्यक्रमाच्या शेवटी महानगर जिल्हा कार्यालयाचे सरचिटणीस सुनील माळी यांनी आभार मानले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, महानगर जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, गणेशभाऊ पाटील, महानगर सरचिटणीस सुहास चौधरी, फराह शेख आणि योगेश लाडवंजारी उपस्थित होते. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त यावेळी शुभेच्छाही देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button