इतर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

*जळगाव दि. १३ प्रतिनिधी* – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे टि-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या मार्गदर्शनातून झाले. जिल्ह्यातून २९ संघानी सहभाग घेतला. पहिला सामना इतिहाद लेसर स्पोर्टस विरुद्ध ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब यांच्या दरम्यान झाला. अतितटीचा झालेला हा सामना ब्ल्यू डायमंड संघाने ७ धावांनी जिंकला. उद्घाटन सोहळ्यावेळी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष युसूफ मकरा यांनी नाणेफेक केली. क्रीडांगण पूजन रवींद्र धर्माधिकारी यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत सचिव अरविंद देशपांडे उपस्थित होते. सूत्रसंचालन मोहम्मद फजल यांनी केले.
ब्ल्यू डायमंड संघातर्फे यश सूर्यवंशी ने ३६ चेंडूत ५४ धावा केल्यात. हितेश पाटील ३४ चेंडूत २७ धावा केल्या. गोलंदाजीमध्ये रफिक शेख ३ विकेट घेतल्यात. त्याला धरू शिसोदे याने २ विकेट घेऊन उत्तम साथ दिली. इतिहाद लेसर स्पोर्टस चे फलंदाज सादिक देशमुख याने ३१ चेंडूत ३१ धावा, रईस शेख १४ चेंडू १९ धावा केल्यात. तर गोलंदाजीत प्रेम दिवेदी याने ४ विकेट घेत समोरच्या संघाचे कंबरडे मोडले. त्याला शशिकांत वर्मा, मनीष चौबे यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद करुन साथ दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button