
चार वर्षांच्या शार्वीने साकारला मातीचा भव्य किल्ला
दिवाळीत चिमुकलीने जपली गडकिल्ल्यांची परंपरा; परिसरातून कौतुकाचा वर्षाव

जळगाव, प्रतिनिधी : दिवाळी म्हटली की आकाशकंदील, फराळ आणि गडकिल्ल्यांची परंपरा आलीच. ही परंपरा जपत जळगाव येथील अवघ्या चार वर्षांच्या कु. शार्वी शिवाजी पाटील हिने मातीपासून सुंदर किल्ला साकारला आहे. तिच्या या कलाकृतीचे परिसरातून कौतुक होत आहे.
शार्वी ही सेंट जोसेफ स्कूल, जळगाव येथे शिक्षण घेत आहे. २६ फेब्रुवारी २०२२ ही जन्मतारीख असलेल्या शार्वीने स्वतःच्या हातांनी माती मळून किल्ल्याची तटबंदी, बुरूज, पायऱ्या आणि तोफ अशा विविध रचना तयार केल्या आहेत. अवघ्या चार वर्षांच्या वयात तिने दाखवलेली कल्पकता आणि मेहनत लक्षवेधी ठरली आहे.
मोबाईलच्या वाढत्या वापराच्या काळात मातीत रमून पारंपरिक किल्ले निर्मितीची संस्कृती जपणाऱ्या शार्वीचे आई-वडील, शिक्षक आणि नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे. तिच्या या उपक्रमातून बालवयातच ऐतिहासिक वारसा आणि गडकिल्ल्यांविषयी आवड निर्माण होण्याचा सुंदर संदेश मिळत आहे.
शार्वीच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.




