
रोजलँड स्कूलतर्फे दिवाळी सुट्टीत क्रीडा शिबिराचे आयोजन
तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ११ ते १७ नोव्हेंबरदरम्यान उपक्रम

जळगाव, प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीला चालना देण्यासाठी आणि त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव देण्यासाठी रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूल, जळगावतर्फे दिवाळीच्या सुट्टीत क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ११ ते १७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत शाळेच्या परिसरात होणार आहे.
या शिबिरात इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. विद्यार्थ्यांसाठी वॉर्मअप व्यायाम, शारीरिक तंदुरुस्तीचे प्रशिक्षण, बास्केटबॉलमधील कौशल्ये, कराटे प्रशिक्षण, योगासने आणि मनावरील ताण कमी करण्यासाठी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच मनोरंजक आणि शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देणाऱ्या गतिविधीही घेतल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैली, आत्मविश्वास, शिस्त आणि क्रीडाभावना विकसित करणे हा या शिबिराचा उद्देश आहे. खेळातून शिकणे, शारीरिकदृष्ट्या सक्षम बनणे आणि आरोग्याची जाणीव निर्माण करणे, यावर शिबिरात भर दिला जाणार आहे.
शिबिरासाठी प्रवेश शुल्क ५०० रुपये असून, अधिक माहितीसाठी ९८९०५४८६१४ आणि ७०३०८८४७५३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.



