खान्देशजळगांव

जळगाव जिल्ह्याला भूकंपाचे धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

जळगाव जिल्ह्याला भूकंपाचे धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

भुसावळ, वरणगाव, रावेरसह जळगाव शहरात हादरे; जिल्हाधिकाऱ्यांकडून दुजोरा

जळगाव, प्रतिनिधी :

जळगाव जिल्ह्यात आज सकाळी सुमारे ९.१५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भुसावळ, वरणगाव आणि रावेर तालुक्यासह जळगाव शहरातील काही भागांतही हे धक्के जाणवले. अचानक घरांना हादरे बसू लागल्याने अनेक नागरिकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली.

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के जवळपास अर्धा मिनिट जाणवत होते. भुसावळ आणि वरणगाव परिसरात हादरे अधिक तीव्रतेने जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळच्या वेळी अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.

जिल्हाधिकाऱ्यांकडून दुजोरा

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, भूकंपाची तीव्रता, केंद्रबिंदू आणि अन्य तांत्रिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. या घटनेबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

धक्के जाणवल्यानंतर नागरिक एकमेकांना फोन करून घटनेची माहिती घेत असून, जिल्ह्यात नेमके काय घडले, याबाबत चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button