
जळगाव l २४ ऑगस्ट २०२३ l रोजी बहिणाबाई चौधरी यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक नरेंद्र पालवे यांनी प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले त्याचप्रमाणे वर्षा चौधरी यांनी बहिणाबाईंचे जीवन चरित्र सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याचा व त्यांच्या परिवाराचा परिचय करून दिला अंजुम तडवी, मानस जगताप, माधुरी हिंगोणेकर, करुणा सुलताने यांनी बहिणाबाईंच्या अरे संसार संसार,आला पहिला पाऊस, अरे खोप्या मंदी खोपा, माणूस या कवितांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आयोजन प्रतिभा लोहार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अतुल पाटील यांनी केले सदर कार्यक्रम प्रसंगी सुचिता शिरसाठ ई.पी. पाचपांडे आर. एन.तडवी डी.बी चौधरी डी ए. पाटील उपस्थित होते.