जळगांवशासकीयसामाजिक

पीएम विश्वकर्मा योजनेचा उद्या शुभारंभ ; लाभार्थींना मिळणार त १ ते २ लाखांचे कर्ज

नवी दिल्ली : विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कारागीर व शिल्पकारांच्या पारंपरिक कौशल्याला प्रोत्साहन देणाऱ्या ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेचा शुभारंभ करणार आहेत. यात, लाभार्थीना पहिल्या टप्प्यात पाच टक्के व्याजदराने एक लाख रुपये व दुसऱ्या टप्प्यात २ लाखांचे कर्ज मिळणार आहे. यातून कारागीर व शिल्पकारांचे कौशल्य विकसित होण्यास हातभार लागणार आहे. विश्वकर्मा योजना ही ग्रामीण व शहरी भागातील कारागिरांसाठी मदतशील ठरणार आहे. पंतप्रधान राजधानी नवी दिल्ली येथील द्वारका स्थित ‘इंडिया आंतरराष्ट्रीय कन्वेंशन व एक्स्पो सेंटर’ (आयआयसीसी) मध्ये ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेची सुरुवात करणार आहेत. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती..

कोणाला मिळेल फायदा?

सुतार, नौकानिर्माते,अस्त्रकार, लोहार, हातोडा व औजार निर्माते, कुलूप बनवणारे, सोनार, कुंभार, मूर्ती शिल्पकार, दगडफोडणारा, चर्मकार, राजमिस्त्री, टोपली, चटई, झाडू बनवणारा, बाहुली व खेळणे बनणारे, न्हावी, माळी, धोबी, शिंपी आणि मासेमारीसाठी जाळे बनविणारे कारागीर

काय मिळणार सुविधा?

विश्वकर्मा योजनेतील कारागीर व शिल्पकारांचा बायोमेट्रिक डेटा तयार करणे, त्याची नोंद ‘पीएम विश्वकर्मा पोर्टल’ वर ठेवणे, विविध सेवा केंद्रांवर त्यांची मोफत नोंदणी, लाभार्थीना ओळखपत्र देणे व कौशल्य विकासासाठी मूलभूत व प्रगतिशील प्रशिक्षण, लाभार्थीना १५ हजार रुपयांची टुलकिट मिळणार आहे.

योजनेसाठी पुढील पाच वर्षांसाठी १३ हजार कोटींचा निधी. उपलब्ध करण्यात आला आहे. हस्तकौशल्याने वस्तू बनवणारे कारागीर व शिल्पकारांना प्रोत्साहन.देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button