पोलीसखान्देशजळगांव

जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल; अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश जारी

पसंतीच्या ठिकाणी नियुक्त्या मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान; मुख्यालयाला पुन्हा प्राधान्य

जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल; अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश जारी
पसंतीच्या ठिकाणी नियुक्त्या मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान; मुख्यालयाला पुन्हा प्राधान्य

खान्देश टाइम्स न्यूज l प्रतिनिधी l २८ मे २०२६  जिल्हा पोलीस दलातील अंमलदारांच्या बहुप्रतिक्षित बदल्यांना अखेर गुरुवारी सायंकाळी मुहूर्त लागला. जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या आणि पाच वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण केलेल्या ३४२ अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून ४० कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांनाही मंजुरी देण्यात आली आहे. या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जारी केले.

तीन पसंतीक्रमांवर आधारित प्रक्रिया

बदलीपात्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई पदावरील कर्मचाऱ्यांकडून काही महिन्यांपूर्वी इच्छित नियुक्तीस्थळांचे तीन पसंतीक्रम मागविण्यात आले होते. याच पसंतीक्रमाचा विचार करून बदल्या करण्यात आल्याने अनेक अंमलदारांना अपेक्षित ठिकाणी नियुक्ती मिळाली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश

या बदल्यांमध्ये २९२ पुरुष अंमलदारांसह ४० महिला अंमलदारांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच स्वेच्छेने बदलीसाठी अर्ज केलेल्या ४० कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या मागणीनुसार नियुक्त्या देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

मुख्यालयासाठी अंमलदारांचा ओढा कायम

पोलीस ठाण्यांमधील तपासाचे वाढते काम, तणाव आणि अंतर्गत जबाबदाऱ्यांमुळे अनेक अंमलदार पोलीस मुख्यालयात नियुक्ती मिळविण्यास अधिक पसंती देत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. यापूर्वी मुख्यालयात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर बदली करण्यात आली होती. मात्र, यंदाच्या प्रक्रियेत अनेक तपासी अंमलदारांनी पुन्हा मुख्यालयालाच पसंती देत नियुक्त्या मिळविल्याने पोलीस मुख्यालयाची आकर्षण कायम असल्याचे दिसून येत आहे.

बदल्यांचे पदनिहाय चित्र

  • सहाय्यक फौजदार / सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक : ४३
  • पोलीस हेड कॉन्स्टेबल : १०१
  • पोलीस नाईक : २५
  • पोलीस शिपाई : १२४
  • विनंती बदल्या : ४०

या आदेशानुसार बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

श्रेणी पोलीस उपनिरीक्षक (ASI) व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संवर्ग:

रवींद्र बिश्वास सूर्यवंशी, राजेश पंढरीनाथ चौधरी, सुनील पंढरीनाथ पाटील, दिपक लक्ष्मण वाघ, शरद पुरुषोत्तम जडे, कन्हेंया त्रिनाथ पाटील, राजेंद्र चिंधा चव्हाण, अनिल विश्वनाथ भांडे, मधुकर पुंडलिक पालोलेवाल, बाळकृष्ण श्रावण पाटील, रहमतअली रहेमान सैय्यद, शंकर पुंडलिक पाटील, सुनील तोताराम आंधळे, राजू देवीदास अडकमोल, हेमंत संतोष देवरे, बापू जगन्नाथ वराडे, पंडीत नामदेव वानखेडे, युवराज बंडू नाईक, सुनील ताराचंद पाटील, शामकांत तुकाराम लाड, अब्दुल रशिद नासिर खान, किशोर गिरधर चौधरी, प्रकाश कडू महाजन, राजेंद्र भास्कर पाटील, संजय गबडू पाटील, चंद्रकांत खेमचंद खाचणे, सुनील रामचंद्र फेगडे, रवि पंढरीनाथ नरवाडे, वाहीद महमूद तडवी, शेख इस्माईल शेख इब्राहिम, जमशेर गफुर तडवी, दिलीप नवल थोरात,

महिला पोलीस अंमलदार (मपोकॉ) संवर्ग:
मंजुळा विलास तिवारी, वनिता संजय बाविस्कर, नंदा काळू पानपाटील, अलका गंगाधर वानखेडे, स्वाती बळवंत पाटील, चंदा ज्ञानेश्वर भालेराव, राणी विष्णू परदेशी, सुशिला सिताराम भिलाला, वंदना युवराज चव्हाण, अलका सुधाकर शिंदे (मराठे), निलोफर जहांगीरअली सैय्यद, उषा बळीराम सोनवणे, प्राची प्रफुलचंद जोशी, सुनिता प्रतापराव पाटील, वंदना शिवलाल आंबिकर, अभिलाषा मुरलीधर मनोरे, अश्विनी गोरख जोगी, रेश्मा कडू मिरगे, नयना हरीदास बडगुजर, सोनाली गुलाब बाफळकर, सुवर्णा भालचंद्र चौधरी, मधु सुरेश तिडके, सुजाता भगवान राणे, आरती मोतीलाल कुमावत, आफरीन कादीर मन्सुरी, भारती विष्णू देशमुख, संगीता बागीराव साबळे, जयश्री प्रकाश मराठे, स्वाती रामचंद्र पाटील, छाया भगवान पाटील, प्रियांका धोंडीराम जोशी, सोंगता भागवत इंगळे, मधुरा वसंत पवार, वर्षा भुषण एरंडे, अश्विनी महेंद्र घोडके, सोनी अकबर तडवी, हर्षला मुरलीधर बनसोड, राजश्री अर्जुन बाविस्कर, अवसाना गनी मन्सार, माधुरी अशोक शिंपी, सविता बाजी राठोड, माधवी मुकेश सोनवणे, सुलतानार्वी आसिफअली सैय्यद, भाग्यश्री ईश्वरसिंग राजपुत, रुपाली वासुदेव डोंगे, दिपमाला दिनकर सोनवणे, नम्रता हरी शेळके (जरे), वंदना आनंदा गंजरे, उज्वला बळीराम माळी.

पोलीस अंमलदार (पोकॉ) पुरुष संवर्ग:
कुणाल वसंत जाधव, मनोज अशोक पाटील, विजय दौलत तायडे, आनंदा हिरामण राठोड, उमेश कालिदास फिरंगे, संजय धोंडू पाटील, गोरख खंडू सोनवणे, संतोष गुलाब सुरवाडे, विनोद प्रकाश चव्हाण, दिलीप केशव चिंचोले, भरत नारायण जेठवे, राजेश सुкदेव काळे, विजय नामदेव सोनवणे, जमील अहमद हमीद खान, प्रभाकर बाळासाहेब पाटील, भूषण विनायक मांडोळे, उमेश बळीराम धनगर, योगेश बापू पाटील, सुनील रामचंद्र थोरात, नरेंद्र अशोक ठाकरे, विलेश प्रकाश सुर्यवंशी, विनोद गोवर्धन मराठे, सचिन श्रावण वाबळे, अमजदखान अलीशेरखान पठाण, हरिश रंगराव धनवडे, मुकेश तांनिराम साळुंखे, किरण अशोक भांबरे, रीतेश प्रकाश बेहरे, मुकेश आधार सोनवणे, सुभाष जयसिंग भिल्ल, विजयकुमार भास्कर साळुंके, संतोष सुरेश चौधरी, संतोष जोतीराम पारधी, अनिल बबनराव पाटील, प्रविण वसंत जगदाळे, प्रविण जनार्दन मांडोळे, संदीप रमेश पाटील, गफारखाँ इक्बालखाँ तडवी, अरुण सुभाष राजपूत, मनोज सुभाष पाटील, श्रीकांत पुरुषोत्तम गांगुर्डे, नरेंद्र देविदास पाटील, सुशिल अरुण चौधरी, जगन गोविंद सोनवणे, सुनिल छगन पाटील, सुनिल पंडीत दामोदरे, शरीफ रहिम शेख, गणेश त्र्यंबकराव शिरसाळे, कालसिंग भिमांसंग बारेला, गजांमल माधवराव पाटील, नरेंद्र माधवराव पाटील, उमेश माधवराव भांडारकर, प्रफुल्ल दिपक धांडे, सुनिल छगन पाटील, समाधान प्रल्हाद टाळकोके, संदीप छगन भोई, प्रमोद महारु पाटील, ज्ञानेश्वर दत्तात्रय पाटील, शैलेश सुधाकर चव्हाण, प्रमोद विनायक पाटील, नितीन प्रकाश बाविस्कर, प्रितमकुमार पितांबर पाटील, विनोद विश्वनाथ सुर्यवंशी, तेजस निंबाजी पारोळकर, अतुल अरुण पाटील, अशोक साहेबराव जाधव, जामीर मुश्ताक शेख, कुशल रमेश शिंपी, उमेश अशोक पाटील, दिपक प्रकाश पाटील, जितेंद्र लोटू पाटील, रविंद्र काशिनाथ मोरे, सुनिल सुधाकर वंजारी, ओमप्रकाश भगवानदास सोनी, जगदीश लिलाधर पाटील, संदीप प्रल्हाद घडगे, सुर्यकांत रघुनाथ साळुंखे, विकास रमेश सुर्यवंशी, अनिल रावसाहेब पाटील, निलेश भาลचंद्र ब्राम्हणकर, रविंद्र भगवान पाटील, शेखर बाबुराव पाटील, मुकेश आनंदा पाटील, किरण लक्ष्मण ब्राम्हणे, मनोज अशोक दुसाणे, संभाजी शामराव पाटील, संजय दगडू पाटील, विकास सुरेश सोनवणे, योगेश सुखराम पाटील, प्रदीप पुंडलिक पाटील, जितेंद्र मगनलाल नारेकर, संदीप अशोक माने, किरण रमेश शिरसाठ, फिरोजखाँ इस्माईल खाँ तडवी, पुरुषोत्तम शामराव बाल्डे, जयदिपसिंग राजेंद्रसिंग राजपूत, सुहास शेषराव पाटील, शिवदास चैत्राम चौधरी, चेतन नारायण ठाकरे, नरेंद्र भाऊराव चौधरी.

या सर्व कर्मचाऱ्यांना नवीन नियुक्तीच्या ठिकाणी वेळेत हजर करून घेण्याची आणि जुन्या ठिकाणाहून तात्काळ मुक्त करण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक शिस्तभंगविषयक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आता प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रशासकीय बदलीविनंती बदली … 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button