खान्देशजळगांवसामाजिक

व्हीआयपी 0001 क्रमांकासाठी मोजावे लागणार ५ लाख रुपये

जळगाव आरटीओची दुचाकींसाठी एमएच-१९ ईझेड नवीन मालिका ५ नोव्हेंबरपासून

व्हीआयपी 0001 क्रमांकासाठी मोजावे लागणार ५ लाख रुपये

जळगाव आरटीओची दुचाकींसाठी एमएच-१९ ईझेड नवीन मालिका ५ नोव्हेंबरपासून

जळगाव, प्रतिनिधी : दुचाकी वाहनांसाठी आकर्षक आणि पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) एमएच-१९ ईझेड ०००१ ते ९९९९ ही नवीन नोंदणी मालिका ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील व्हीआयपी ०००१ क्रमांकासाठी तब्बल ५ लाख रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.

पसंतीच्या क्रमांकासाठी ३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज

नवीन वाहनासाठी आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करू इच्छिणाऱ्यांनी २ आणि ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत जळगाव आरटीओ कार्यालयात अर्ज सादर करावेत. एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जदारांना ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत वाढीव शुल्काचा धनाकर्ष (डीडी) स्वतंत्र बंद लिफाफ्यात सादर करावा लागेल.

एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास…

एकाच पसंतीच्या क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास ४ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता अर्जदारांसमोर बंद लिफाफे उघडून नियमानुसार पसंतीचा क्रमांक वितरित केला जाईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी राकेश वर्मा यांनी दिली.

पसंतीच्या क्रमांकांसाठी शुल्क किती?

शासनाच्या ३० ऑगस्ट २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार नवीन मालिकेतील विशेष क्रमांकांसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.

०००१ या क्रमांकासाठी ५ लाख रुपये, तर ०००९, ००९९, ०७८६, ०९९९ आणि ९९९९ या क्रमांकांसाठी प्रत्येकी २ लाख ५० हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

०१११, ०२२२, ०३३३ ते ०८८८ तसेच ११११ ते ८८८८ या विशेष क्रमांकांसाठी १ लाख रुपये शुल्क आहे. ०००२ ते ०००८ आणि अन्य विशेष क्रमांकांसाठी ७० हजार रुपये, तर इतर पसंतीच्या क्रमांकांसाठी २५ हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button