खान्देश टाईम्स न्यूज | शेख मुख्तार | सावदा येथे मदार फाऊंडेशनतर्फे शाह मुस्लिम बिरादरीच्या सामुहिक विवाह मुस्लिम रिती रिवजाने २१ वधू वर जोडप्यांचा विवाह संपन्न झाला.
सामूहिक सोहळ्याच्या निमित्ताने आजच्या काळात महागाई भरपूर आहे तसेच समाजात गोरगरीब नागरिक बरेच आहे. मुला मुलींच्या लग्न खर्च म्हणजे आयुष्य भर कमवलेले पैसे एक दिवसामध्ये गेले अशी परिस्थिती आहे. सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून अनावश्यक खर्च टाळण्याची एक चांगली मुभा उपलब्ध होते. कार्यक्रमात मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावून देणगी म्हणून एक लाख रुपये दिले व मदार फाऊंडेशनचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्षा लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे होत्या तर उद्घाटन आ.डॉ.फारुख शहा यांच्या हस्ते झाले.
प्रमुख अतिथी आ.चंद्रकांत पाटील तसेच सावदा येथील नगरसेवक फिरोज खान पठाण व शिवसेनाचे सूरजसिंग परदेशी तसेच जेष्ठ पत्रकार युसुफ शाह शेख, कमरूदिन शेख, सांडु दगडु शाह, कामील मेंबर तसेच गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.