जळगाव l ०२ जुलै २०२३ l मुक्ताईनगर l राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे आपल्या आठ समर्थक आमदारांना घेऊन भाजपा शिंदे गटाच्या सरकार मध्ये सामील झाले असून मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा वढोदा परिसरातील भाजपा कार्यकर्ते, शिंदे गट आणि अजित पवार समर्थकांनी ठिकठिकाणी फटाके फोडून त्यांच्या निर्णयाचे स्वागत करत जल्लोष केला.
कुऱ्हा येथे फटाके फोडून आनंद व्यक्त करताना अशोक कांडेलकर आणि कार्यकर्ते
कुऱ्हा येथे जल्लोष – येथील बसस्थानक परिसरात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच फटाके फोडून एकमेकांना पेढे भरविण्यात आले. यावेळी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख तथा जि. प. चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, रसाल पवार, पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र सवळे, विनोद पाटील, चंद्रकांत बोराखेडे, भाजपा शहर अध्यक्ष रविंद्र राजपूत, अजीजखान, प्रवीण शिंपी, अजगर खान पठाण, संतोष उगले, प्रवीण भोंबे, आनंद हिरोळे, मधुकर अण्णा पाटील, देविदास दांडगे, प्रभाकर सुशीर, नंदू खिरळकर, दलपत भोई, रामभाऊ भवरे, गोलू कांडेलकर, कल्पेश राठोड, प्रदीप गोंधळी, राजू मिस्तरी, अमोल खिरळकर आदी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिंदे गट, अजित पवार समर्थकांचाही जल्लोष – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी समर्थकांसह सरकार मध्ये सामील होऊन मंत्रिपदाची शपथ घेतल्याची बातमी कानी पडताच येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिंदे गट आणि अजित पवार समर्थक रणजीत गोयनका, अनंता पाटील, राहुल खिरळकर, अविनाश वाढे, विनोद पाटील, भैय्या कांडेलकर, मंगेश पाटील, पंकज धाबे, ज्ञानेश्वर तायडे, मुळतकर, दीपक वाघ यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.