पाचोरा;- तालुक्यातील गाळण येथे राहणाऱ्या 34 वर्षीय तरुणाला सर्पदंश झाल्याने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. यावरून पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे..
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की गाळण येथील विष्णू नगर मध्ये राहणारा भाऊसाहेब भीमसेन राठोड वय 34 याला सर्पदंश झाल्याने त्याचे काका राजेंद्र गोकुळ राठोड यांनी ग्रामीण रुग्णालयात मृतावस्थेत दाखल केल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.