
जळगाव ;- शहरातील गजबजलेल्या सुभाष चौक परिसरातून अज्ञात चोरट्याने ८० वर्षीय वृद्धाच्या हातातील पिशवीतून ६० हजारांचा रोकड आणि पेन्शन पुस्तक ,चेकबुक चोरून नेल्याचा प्रकार १४ रोजी दुपारी दीड ते २ वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली महिती अशी कि , जाहूर अली वजीर अली सैय्यद वय ८० रा. सालार नगर हे सेवानिवृत्त कर्मचारी असून ते १४ रोजी फुले मार्केट मधील दानाबाजार येथून सुभाष चौक जवळील रस्त्यावर दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान आले असता त्यांच्या हातातील प्लास्टिक पिशवीमधून अज्ञात चोरट्याने ६० हजारांची रोख रक्कम आणि पेन्शन पुस्तक,चेक बुक चोरून नेल्याचा प्रकार घडला . याप्रकरणी सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला गुणही दाखल करण्यात आता आहे.