गुन्हेजळगांव

अवैध दारू अड्डे बंद करा : जनक्रांती मोर्चाची मागणी

जळगाव l ०३ जुलै २०२३ l यावल तालुक्यातील पाडळसे गावात बेकायदेशीर अवैध दारू अड्डे बेसुमारपणे चालू असून या दारू अड्ड्यांमुळे गरीब कष्टकरी महिलांचे संसार उध्वस्त होत आहे वारंवार फैज़पुर पोलिस स्टेशनला दारू अड्डे बंद करणे बाबत तक्रारी केलेल्या आहे तरी सुद्धा सुमारे 15 ते 20 दारूअड्डे सर्रासपणे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे, गेल्या 8 दिवसांपूर्वी 27 वर्षाचा तुषार तावड़े नावाचा युवक विषारी दारू सेवन करुण मरण पावला या सन्दर्भात पोलिसांनी सखोल चौकशी करावी व दारू व्यवसाय करणाऱ्यानवर कठोर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी व कायमस्वरूपी दारू अड्डे बंद करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा तर्फे तीव्र निदर्शने करुण उपजिल्हाधिकारी व अप्पर पोलिस अधीक्षक यांना निवेदन सादर करुण करण्यात आली.

या निदर्शने आंदोलन जनक्रांती मोर्चाचे राज्य अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांचे नेतृत्वात करण्यात आले यावेळी जनक्रांति मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तायड़े जिल्हा अध्यक्ष, साहेबराव वानखेड़े, संग्राम कोळी, सूरज कोळी, तुषार भोई, किरण तायड़े, विशाल सपकाळे, सय्यद टकारी , मनोज पाटील, इत्यादीसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button