खान्देश टाईम न्यूज l सुभाष धाडे l गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी बोअरवेल हरविलेली असून शोधुन देण्यात यावी अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा गटविकास अधिकारी यांना गामस्थांतर्फे देण्यात आलेल्या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आला असल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे डोलारखेडा येथे घडली आहे.
अंदाजे सन २००९-१० मध्ये तत्कालीन सरपंच बाजीराव कोळी, उपसरपंच शंकर इंगळे व तत्कालीन ग्रामसेवक प्रमोद पिवटे यांनी कोणत्यातरी योजनेंतर्गत सुकळी ग्रामपंचायत अंतर्गत मौजे डोलारखेडा येथे सार्वजनिक पाणीपुरवठा करण्यासाठी बोअरवेल ची निर्मिती केली होती. परंतु सन २०१९-२० च्या दरम्यान कोणीतरी सदर बोअरवेल बुजवले असल्याचा सनसनाटी आरोप करीत सदर बोअरवेल दि.९ जानेवारी २०२४ पर्यंत राहाल शोधुन देण्यात यावी अन्यथा दि.१० जानेवारी २०२४ ला गावकऱ्यांमध्ये डोलारखेडा येथे रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेला आहे. एखाद्या चित्रपटाला साजेसा प्रकार इथं घडलेला असुन प्रशासनात यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे.
निवेदनावर शिवाजी वानखेडे, गौतम इंगळे, सचिन तायडे, विनोद इंगळे, रविंद्र सुरवाडे, नीना सुर्यवंशी यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
सदर प्रकरणी प्रशासनाकडून काय कारवाई होते,हरविलेली बोअरवेल शोधण्यात प्रशासनाला यश येईल काय?याकडे परीसरातील जनतेचे लक्ष लागुन आहे.