खान्देशगुन्हेजळगांव

सारंगखेडा येथून दुचाकी चोरट्याला अटक

जळगाव : नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथून दुचाकी चोरी करणारा सराईत चोरटा इमरान अय्योद्दीन पिंजारी (वय ३३, रा. अनरद, ता. शहादा, जि. नंदुरबार) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथून दि. १० मार्च रोजी इमरान पिंजारी याला चोरीची दुचाकी घेवून फिरतांना एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळून आला. त्यांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या, त्याच्याकडून चोरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, पोहेकों गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, छगन तायडे यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button