मंत्री ना.अनिल पाटील व माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्या उपस्थितीत रावेर तालुक्यातील सावदा शहर येथील अनेक राष्ट्रवादी पदाधिकारी यांनी दिला जाहीर पाठिंबा…
खान्देश टाईम्स न्यूज l ०९ जुलै २०२३ l जळगाव l राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार अनिल दादा पाटील व माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्या उपस्थितीत सावदा येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष, महिला अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, मागासवर्गीय अध्यक्ष यांच्यासह सर्व पक्षाचे कार्यकर्ते यांनी आज अजितदादा पवार गटात दाखल होत आपला जाहीर पाठिंबा दिला. यानिमित्ताने जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अजितदादा पवार यांच्या समर्थनाचा पोळा फुटला असून ही एक दमदार सुरुवात मानली जात आहे.
आज नवनियुक्त मंत्री अनिल पाटील हे रावेर दौऱ्यावरती सावदा येथे आले असता त्यांनी राजेश वानखेडे यांचे निवासस्थानी भेट दिली, यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी आमदार मनीष जैन , जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ताराबाई वानखेडे ,जळगाव महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील धरणगाव चे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन , जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष रवींद्र नाना पाटील, मीनल ताई पाटील भुसावळच्या माजी नगराध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांच्यासह यावल रावेर तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी राजेश वानखेडे यांचे निवासस्थानी झाली होती.
अजितदादा पवार यांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जळगाव जिल्ह्यातील पहिला प्रवेश सोहळा सावदा येथे झाला. दिवसेंदिवस अजित दादा पवार यांना समर्थन वाढत जाणार असून त्यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची फौज असल्याचे सिद्ध होत आहे. अजित पवार गटाचा जळगाव जिल्ह्यात पोळा फुटला अशी चर्चा सुरू झाली असून आगामी काळात अजून मोठं मोठे प्रवेश सोहळे होणार असल्याचे संकेत देखील यानिमित्ताने मिळाले आहेत.