खान्देशगुन्हेजळगांव

गोराडखेडा येथे भरधाव कारने चौघांना उडविले ; वृद्धासह विद्यार्थिनी ठार

संतप्त जमावाने वाहन पेटविले ; जळगावच्या पाच जणांना अटक

पाचोरा;- शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या गोराडखेडा खुर्द गावाजवळ पाचोऱ्याकडून अतिशय भरधाव वेगाने जळगाव कडे जाणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थीनी, एक पायदळ इसम आणि एक मोटार स्वारास स्विफ्ट डिझायरने ३०० किलोमीटर फरफटल्याने गंभीर अपघात झाला असुन एक ९ वीची विद्यार्थींनी व एक वृद्ध जागेवरच ठार झाले तर एक मोटरसायकल स्वार इसम गंभीर जखमी झाला असून त्यांना जळगांव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
मात्र संशयित पाच आरोपींना पोलिस ठाण्यात आल्यानंतर सुमारे ५०० गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात आरोपींना आमच्या ताब्यात द्या या मागण्यासाठी दोन तास पोलीस ठाण्यात राडा घातला.

गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान सुभाष रामभाऊ पाटील (वय – ६० वर्षे) हे घरी जात असतांना त्यांना पाचोऱ्याकडुन जळगांव च्या दिशेने जाणाऱ्या मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (क्रं. एम. एच. १४ सी. सी. ९२७६) गाडीच्या चालकाने ठोस मारुन २०० फुट फरफटत नेले. यानंतर पाचोरा येथील पी. के. शिंदे विद्यालयाची इयत्ता ९ वीत शिक्षण घेणारी व आईवडीलास एकुलती एक असलेली मुलगी कु. दुर्वा भागवत पवार व ऋतुजा राजेश भोईटे ही १० वीची विद्यार्थीनी ह्या दोन्ही विद्यार्थींनी सायकलवर पाचोरा येथून गोराडखेडा येथे घरी जात असताना त्यांना देखील स्विफ्ट डिझायर गाडीने धडक दिली. व नंतर पुढे परशुराम दगा पाटील (वय – ५१) हे आपल्या मोटारसायकल वरून घरी जात असतांना त्यांना देखील धडक मारुन उडविले या विचित्र अपघातात दुर्वा भागवत पवार व सुभाष रामभाऊ पाटील हे जागीच ठार झाले आहे. परशुराम दगा पाटील हे गंभीर जखमी असल्याने त्यांना जळगाव येथे तर ऋतुजा राजेश भोईटे हिस पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळा वरुन संशयित आरोपी मुजावीत शेख बसीर (वय – २३) १७ नं. शाळा, बळीराम पेठ, जळगांव (चालक), विवेक किशोर मराठे (वय – २४) ब्राह्मण सभेच्या मागे, बळीराम पेठ, जळगांव, राजेश सदाशिव बांदल (वय – ३२) रा. शिवाजी नगर उस्मानिया पार्क, रायगड बिल्डींग, जळगांव, रौनक रविंद्र गुप्ता (वय – २४) रा. शनिपेठ पोलिस स्टेशन बळीराम पेठ, जळगांव, दुर्गेश योगेश पाथरवट (वय – २०) रा. घर नं. ७४ नॅशनलिझम समोर बळीराम पेठ, जळगांव या ५ जणांना पोलिसांनी घटनास्थळावरुन ताब्यात घेतले असुन पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button