भुसावळ ।३० जुलै २०२४ l तालुक्यातील कुर्हे येथील गट क्र. 202 व 202/1 यावरील फेरफार क्रमांक 13323 व 13324 नोंदी संदर्भात नमुना 9 वरील बोजाच्या रकमेवर खाडाखोड करून करोडो रूपयांचे बोजे उतरविण्यात आले होते. याप्रकरणी सदरची फेरफार नोंद क्र. 13323 व 13324 या नोंदी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी नामंजूर करत बोजा कायम ठेवण्याचे आदेश 29 जुलै रोजी दिले आहे. याबाबत नोंद क्र 14509 ची नोंद घेण्यात आली आहे. दि.30 जुलै रोजी अखेर ती जुनी नोंद रद्द करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी याबाबत तक्रार केली होती.