
जळगाव : घर खाली करण्याच्या कारणावरुन भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलेला संशयित शेरा उर्फ शेखर हरी सपकाळे (रा. वाल्मिक नगर, बालाजी मंदिरामागे) याने अश्लिल शिवीगाळ केली. ही घटना दि. ९ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कोळपेठ परिसरात घडली.
याप्रकरणी संशयिताविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका परिसरात महिला वास्तव्यास असून त्या भाजीपाला विक्री करुन आपला उदनिर्वाह करतात. दि. ९ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास महिला रस्त्याने जात असतांना शेरा उर्फ शेखर सपकाळे याने महिलेला शिवीगाळ करीत थांबवले. त्यानंतर तीन दिवसात घर खाली कर असे म्हणत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशी अश्लिल शिवीगाळ केली. तसेच महिलेला पोलीसात तक्रार केल्यास मी बघून घेईल अशी धमकी देखील दिली. महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन शेरा उर्फ शेखर हरी सपकाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भागवत शिंदे हे करीत आहे.