खान्देशगुन्हेजळगांव

शहरातील जुगार अड्डयांवर डीवायएसपींच्या पथकाचा छापा

जळगाव : शहरातील मुख्य बाजारपेठेचा परिसर असलेल्या दाणा बाजार परिसरातील सुभाष डेअरीच्यामागील गल्लीसह राजकमल टॉकीज समोर सुरु असलेल्या सट्टापेढीसह जुगार अड्डा सुरु होता. याठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून ३ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चार जणांविरुद्ध शहर व शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठेचा परिसर असलेल्या दाणा बाजार परिसरात असलेल्या सुभाषडेअरीच्या मागील गल्लीमध्ये आणि राजकमल टॉकीज परिसरात अवैधरित्या सट्टा

व जुगाराचा अड्डा सुरु होता. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने मंगळवारी दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान पथकाने दोन्ही ठिकाणी छापा टाकला. याठिकाणाहून

संशयित सचिन आनंदा जाधव, संजय भाऊलाल चौधरी आणि सखाराम भटू चौधरी या तिघांना ताब्यात घेतले तर राजू पाटील हा फरार झाला आहे. पोलीसांनी केलेल्या करवाईत ३ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयितांविरुद्ध शहर व शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाची कारवाई ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे, नाना तवर, पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र बोदवडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील, बालाजी बारी, मनोहर वानखेडे यांच्या पथकाने केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button