जळगाव : घरात कोणीही नसताना आतून दरवाजा बंद करून दोरीच्या साह्याने एका 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील ममुराबाद येथे उघडकीस आले असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील ममुराबाद येथील योगेश उर्फ शुभम कैलास शेटे (वय २४) असे मयत तरुणाचे नाव आहे.
ममुराबाद येथे योगेश उर्फ शुभम शेटे हा तरुण वास्तव्यास होता. हातमजूरी करुन तो कुटुंबाला हातभार लावित होता. दुपारच्या सुमारास घरात एकटाच असतांना शुभमने
घराचा दरवाजा लावून दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. हा प्रकार त्याच्या आईच्या लक्षात आल्यानंतर शेजारच्या नागरिकांनी धाव घेऊन शुभमला खाली उतरवत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शुभमला मृत घोषित केले. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.