नवी दिल्ली वृत्तसंस्था : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे रणशिंग आज फुंकले गेले असून भारतीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार 5 फेब्रुवारीला मतदान होऊन 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.
दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. 1.5 कोटी हून अधिक उमेदवार दिल्लीत आहेत. 2.08 लाख मतदार असे आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. एका टप्प्यात दिल्लीची निवडणूक होणार आहे.
70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारीला संपतो आहे. 2020 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा 6 जानेवारीला झाली होती.