
महापालिकेच्या पथकाची नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या २ विक्रेत्यांवर कारवाई
जळगाव I प्रतिनिधी जळगाव शहरात मकर संक्रातिला प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या तीन विक्रेत्यांवर मनपातर्फे आज १४ रोजी कारवाई करून पंधरा हजाराचा दंड आकारण्यात आला.
कुसुंबा येथील गुरूदत्त कॉलनीतील उत्तम रामकृष्ण भोई तसेच अयोध्या नगरातील हनुमान नगर परिसरातील प्रतिभा दिलीप पोळ,मनीष आदिनाथ सांगवे यांच्याकडून प्रत्येकी ५ प्लास्टिक मांजा चकरी , २० प्लास्टिक मांजा रिल जप्त करून ५ हजार रुपये प्रमाणे दंड करून एकूण १५ हजार रुपये दंड करण्यात आला.
महानगर पालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक जितेंद्र किरंगे, रमेश कांबळे,मनोज राठोड, रुपेश भालेराव, नंदू गायकवाड, नितीन जावळे यांनी हि कारवाई केली.