
जळगाव : = आठवडे बाजारामध्ये खरेदीसाठी गेलेले असताना प्रकाश मन्साराम वाध (४२) यांचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना १० जानेवारी रोजी संध्याकाळी पिंप्राळा आठवडे बाजारात घडली. या प्रकरणी ११ जानेवारी रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा येथील आठवडे बाजार असल्याने त्या ठिकाणी प्रकाश वाघ हे भाजीपाला व इतर खरेदीसाठी गेले होते. त्या वेळी त्यांनी मोबाईल शर्टाच्या खिशात ठेवलेला होता. खरेदीदरम्यान चोरट्यांनी वाघ यांच्या खिशातून मोबाईल लांबवला. काही वेळा नंतर मोबाईल गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर वाघ यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.