मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या तरुणाचा मेहरून तलावात बुडून मृत्यू

मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या तरुणाचा मेहरून तलावात बुडून मृत्यू
जळगाव प्रतिनिधी I शहरातील मेहरून तलाव येथे मित्रांसोबत होण्यास गेलेल्या एका 24 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शनिवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली घडली असून उशिरा आलेल्या प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांमुळे उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी मेहरून तलाव येथे गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मोहम्मद नदीम शेख गनी वय 24 रा. तांबापुरा परिसर असे मृत युवकाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद नदीम हा त्याच्या अन्य चार मित्रांसह आज शनिवार 7 जून रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास मेहरुन तलाव येथे पोहोण्यासाठी आला होता. यावेळी मोहम्मद नदीम याचे तीन मित्र तलावात पोहण्यासाठी गेले. तसेच मोहम्मद नदीम आणि त्याचा एक मित्र काठाजवळच उभे होते. मात्र तो मित्र घरी निघून गेला.थोड्यावेळात मोहम्मद नदीम हा पाण्यात पोहण्यास उतरला. मात्र पाणी खोल असलेले आणि त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाल्याने मृत पावला. प्रत्यक्षदर्शींनी ही घटना बघितल्यानंतर मदतीसाठी आरडाओरड केली. तसेच अनेकांनी मनपा अग्निशामक दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांना युवक बुडाल्याची माहिती दिली. मात्र पोलिसांनी बचाव दलाचे कर्मचारी उशिरा आल्यानंतर त्यांनी नदीम याचा मृतदेह तलावातून बाहेर काढून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. या ठिकाणी मृत युवकाच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून एकच आक्रोश केला. दरम्यान घटनास्थळी आमदार राजू मामा भोळे आणि इतर कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव कारवाई करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान मेहरून तलाव परिसरात कुठलीही आपत्कालीन व्यवस्था सांभाळणारे कर्मचारी नसल्याने युवकाला आपले प्राण गमवावे लागल्याची चर्चा या ठिकाणी होत होती.. संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली.
याबाबत रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.