
सुन्नी ईदगाह येथे ईद उल फित्र (रमजान ईद) उत्साहात
जळगाव प्रतिनिधी
दरसाला बाद प्रमाणे यंदाही मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद – ऊल – फित्र (रमझान ईद ) निमित्त जळगांव शहरातील सर्व सुन्नी मुस्लिम बांधवांनी नमाझ – ए – ईद – ऊल – फित्र ( रमझान ईद ची नमाझ ) अत्यंत भक्तिभावात सुन्नी ईदगाह मैदान, नियाज अली नगर, जळगांव या ठिकाणी आज दि. 31 सोमवार रोजी सकाळी 8:45 वाजता मौलाना जाबीर रझा अमजदी यांच्या नेतृत्वात अदा (पठण ) करण्यात आली.
सर्व प्रथम सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगांव चे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांनी प्रास्ताविकात आलेल्या सर्व समाज बांधवांचे स्वागत करून सर्वांना ईद मुबारक म्हणत ईद च्या शुभेच्छया देऊन ट्रस्ट ची वर्षभराचे हिशोब सादर करून सर्वांनी शांततेत कायद्याच्या चौकटीत राहून ईद साजरी करावी असे आवाहन केले. या प्रसंगी ईदगाहवर ब्लॉक लावण्यासाठी वर्गणी गोळा करण्यात आली.
या प्रसंगी तरिका ए नमाझ ( नमाझ पठणाची पद्धत ) मौलाना नजमूल हक यांनी सांगितली, सलातो सलाम मौलाना अब्दुल रहीम यांनी म्हटले. बयान मौलाना अलीम रझा यांनी केले. या प्रसंगी ” ए अल्लाह हम सबकी हिफाजत फरमा, हमारे मुल्क भारत को सर सब्झ रख, मुल्क मे आपसी भाईचारा बढे, बेरोजगार को रोजगार अता कर ” अशी दुआ ( प्रार्थना ) करण्यात आली. या प्रसंगी सै. अयाज अली नियाज अली यांनी जळगांव जिल्हा पोलीस दल व जळगांव शहर महानगर पालिकेचे नमाज पठणासाठी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.
या प्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रझा, मौलाना नजमूल हक, इकबाल वझीर, मौलाना झुबेर आलम, मौलाना अब्दुल रहीम, मौलाना अलीम रझा, मौलाना मतीन रझा, मौलाना फिरदौस रझा, मुख्तार शाह, मौलाना तैफुर रझा, अफझल मनियार, रशीद कुरेशी, शाकीर चित्तलवाला, सय्यद जावेद, उमर खान यांसह सुमारे सोळा हजार समाज बांधव उपस्थित होते.