मुंबई ;- आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते पद्माकर वळवी यांनी बुधवारी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.
नंदुरबार येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आदिवासी समाजाचा चेहरा असणारे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे .